शासननिर्णय कसा शोधावा

"कोणताही शासननिर्णय ( GR ) कसा शोधावा 

"नमस्कार शिक्षक मित्र हो,   

 ★शासननिर्णय शोधणे  सोपे आहे

आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय GR लगेच  शोधु शकतो.
■पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या,संदर्भ  चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो .
■माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा  वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही कोणताही  GR लगेच शोधु शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून शासननिर्णय कसा शोधावा.

या संदर्भातील काही तंत्र व पायऱ्या   खालीलप्रमाणे

■ प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर म्हणजेच www.maharashtra.gov.in वर जावा.
■ या वेबसाईट च्या होमपेज वर आपल्याला शासननिर्णय हे बटन किंवा TAB दिसते .
■ शासननिर्णय बटनावर क्लिक केल्यावर शासननिर्णयाचे  पेज ओपन होते .यावर ■आपल्याला खालील बाजूला GR दिसतात व वर इतर मेनू दिसतात .
■ प्रत्येक GR च्या डाउनलोड TAB  ला क्लिक करून आपण GR डाउनलोड करू शकतो

शासननिर्णय पेज वरील मेनुंची ओळख 

 विभाग -   विभाग सिलेक्ट करून विभागानिहाय GR  शोधू शकतो.
यामध्ये शासनाचे सर्व विभाग दाखवलेले आहेत .
महत्वाचा शब्द -    यामध्ये शोधायच्या GR  मधील महत्वाचा शब्द टाकून ' शोधा ' या बटनावर क्लिक करून GR शोधू शकतो .दिनांकापासून / दिनांकापर्यंत - यामध्ये आपण ज्या दिवशीचा GR शोधायचा आहे, ती दिनांक टाकून 
" शोधा " या बटनावर क्लिक  करा म्हणजे आपल्यासमोर त्या दिवशीचा GR ओपन होईल . सांकेतांक -GR चा सांकेतांक टाकून आपण जो हवा तो GR मिळवू शकतो . GR शोधत असताना आपल्याला शोधा या बटनावर क्लिक मारावी लागते . शोधून पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक करावी .

धन्यवाद
Education_Katta
Email:-Info@EducationKatta.Com

Comments

Popular posts from this blog

रजा अधिनियम १९८१