शिक्षक दिन

खरा शिक्षक दिन 
( राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन )

॥ विद्येविना मती गेली ॥
॥ मतिविना नीती गेली ॥
॥ नीतिविना गती गेली ॥
॥ गतिविना वित्त गेले ॥
॥ वित्ताविना शूद्र खचले ॥
॥ इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥

चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे... कुणबी युवा प्रचारप्रमुख जयेश  पागडे यांच्या वाचन द्रुष्टीतून राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर शिक्षक दिन का साजरा करावा ? वाचा व निर्णय घ्या

राष्ट्रपिता जोतीराव फुले

◆जन्म ११ एप्रिल १८२७
◆सर्वपल्लींच्या ४० वर्ष अगोदर शिक्षण चळवळीस प्रारंभ ( १८४८ )
◆चार वर्षात २० शाळा सुरु केल्या ( त्यावेळी डॉ.राधाकृष्णन यांच्या वडील यांचा जन्म झाला नव्हता.)१८४८ -१८५१ 
◆विनावेतन ( मोफत ) बहुजनांना आणि स्त्रियांना शिकविले.
◆बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करून शिकविले
◆खेड्यापाड्यात २० शाळांची सुरुवात केली.
◆विज्ञानवादी,प्रयत्नवादी,अनिष्ट्प्रथा विरोधी,स्वर्ग-नरक संकल्पना अमान्य,शिक्षण पाहून विवाह करावा असे स्पष्ट मत.
◆बालविवाहाला विरोध तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन.
◆स्त्रियांसाठी देशात सर्वप्रथम शिक्षणास सुरुवात ( १ जानेवारी १८४८ )
◆पत्नीचा (सावित्रीमाई) शिक्षणातून आत्मविश्वास वाढविला,चूल-मूल या निर्दय धर्मव्यवस्थेवर आघात करून पत्नीला सर्वप्रथम शिक्षन देऊन महिलांना शिक्षणाची प्रेरणा द्यावी लागते.
◆वर्णव्यवस्थेचे कट्टर विरोधक म्हणजेच बहुजनवादी.
◆शिक्षण एहीक व व्यावसाहिक असावे.
◆ते म्हणतात स्त्रीयांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी.
◆गरीब बहुजनांसाठी तळमळ होती म्हणून ‘गुलामगिरी’ ग्रंथ लिहून बहुजनांना गुलामीची जाणीव करून दिली.
◆मिळकतीचे सर्व पैसे शिक्षणासाठी खर्च करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला.
◆बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी लेखन,उदा.गुलामगिरी,शिवाजीराजांचा पोवाडा,शेतकऱ्यांचा आसूड,सार्वजनिक सत्यधर्म,देशातील पहिले नाटक-तृतीयरत्न इ.ग्रंथ
◆यांच्या साहित्यामुळेच देशात परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली.
◆यांच्या प्रेरणेतूनच बहुजनवादी अनेक संघटना निर्माण झाल्या.
◆अज्ञान,अंधश्रद्धा,विधवा विवाह,भ्रूणहत्या,अस्पृश्यता,स्त्रीशिक्षण या ज्वलंत प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा.
◆खेडोपाडी शाळा चालवून शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला.
◆भारतीय शिक्षणाआयोग म्हणजेच हंटर आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत यासाठी इंग्रजांना धारेवर धरले.
◆तथागत गौतम बुद्ध,बळीराजा,शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान समजून सामाजिक परिवर्तन केले.
◆सत्यशोधक समाज-संस्थापक,शिवजयंतीचे जनक,शेतकरी संघटना,कामगार संघटना,नाभिक संघटना,भृनहत्त्या प्रतिबंधक गृह इ.सार्वजनिक कार्यात सक्रीय.
◆वाट्याला पुरस्कार नव्हे तिरस्कार प्राप्त झाला.परंतु जनतेने महात्मा पदवी दिली.(परिवर्तन कार्यास पुरस्कार मिळतो का?)
◆"२८ नोव्हेंबर" राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन जनतेतून शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम... (ज्यांच्यामुळे आज आपण बहुजन समाज शिक्षण घेत आहोत याची जान असेल तर हा लेख शेअर करावा व "२८ नोव्हेंबर" हाच खरा शिक्षक -दिन म्हणुन साजरा करावा.

Comments

Popular posts from this blog

रजा अधिनियम १९८१